राजूंच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली

January 23, 2009 9:22 AM0 commentsViews: 3

22 जानेवारी सत्यम प्रकरणात रामलिंग राजू, त्याचा भाऊ बी राजू आणि श्रीनिवास वदलामणी यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी 27 जानेवारीपर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे. दरम्यान सत्यमसाठी नव्या सीईओची निवड आज होण्याची शक्यता आहे. सीईओ पदासाठी 40 अर्ज आत्तापर्यंत आले आहेत. कंपनीसाठी फंड जमा करणे तसंच अमेरिकेत सत्यमविरुद्ध दाखल असलेल्या कोर्ट केसेसच्या विरोधात कारवाई करणं ही सध्या बोर्डासमोरची महत्त्वाची कामं आहेत. सत्यमला खरेदी करणारी कंपनी निश्चित करण्यासाठी देखील बोर्ड सदस्यांचा विचारविनिमय सुरू आहे. दरम्यान रामलिंग राजूंनी सुमारे 400 बेहिशेबी जमीन सौद्यांसाठी बनावट फिक्स्ड डिपॉझिट बनवल्याचं उघडकीस आलं आहे. तसंच राजूनी कर्मचारी संख्यादेखील 13 हजारांनी वाढवून सांगितल्याचं समजलंय. किमान 1200 कोटी रुपये राजूंनी त्यांच्या कुटुंबियांच्या खात्यात वळवले असल्याचंही आता उघड झालंय

close