केंद्रसरकारच्या धोरणांवर मोदींची टीका

January 23, 2009 2:20 PM0 commentsViews: 4

22 जानेवारी जळगावअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला जळगावात सुरुवात झाली. गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या चार दिवसीय अधिवेशनाचं उदघाटन केलं. त्यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी बांगलादेशी घुसखोरा विरोधात देशव्यापी चळवळ उभी करण्याचं आवाहन केलं. तसंच दहशवादाविरुद्ध सरकार नरमाईचं धोरण का स्वीकारतंय असा सवालही त्यांनी केला. देशाचं शैक्षणक धोरण, राष्ट्रीय सुरक्षितता आणि आर्थिक क्षेत्र यांवर या अधिवेशनांत चर्चा होतं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देशभरांत 16,35,000 हजार सदस्य आहे. जवळपास 3600 महाविद्यालयातून परिषद विद्यार्थ्यांसाठी कार्य करते.

close