उदयनराजेंची दमबाजी

July 19, 2013 7:22 PM0 commentsViews: 4668

19 जुलै : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला खासदार उदयनराजे भोसले यांचा वेगळाच खाक्या आज अनुभवायला मिळाला. गुन्हेगारांची जनतेवरची दादागिरी वाढलीय आणि पोलीस प्रशासन जनतेला मदत करत नाहीत अशी तक्रार उदयनराजे यांची तक्रार आहे. ही तक्रार घेऊन उदयनराजेंनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली आणि आपल्या स्टाईलमध्ये दम भरला. आपल्याला जर जनतेचं रक्षण करता येत नसेल तर मी बांगड्या भरलेल्या नाहीत असे खरमरीत बोल सुनावले.

close