7 फुटांचा अजगर आढळला

July 19, 2013 7:34 PM0 commentsViews: 669

19 जुलै : मुलुंडमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या वस्तीत आज 7 फुटांचा अजगर आढळला. त्यामुळे नागरिकांची एकच भंबेरी उडाली. अखेर सर्पमित्रांच्या मदतीनं या अजगराला पकडून बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलं. वाढत्या नागरिकरणामुळे जंगली प्राणी वस्तीत येण्याच्या घटना घडत आहेत. अशावेळी नागरिकांनी घाबरुन न जाता सर्पमित्रांच्या सहाय्यानं प्राण्यांचे जीव वाचवावेत असं आवाहन प्राणी मित्रांनी केलं.

 

close