जागावाटपाबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत

January 23, 2009 9:26 AM0 commentsViews: 2

22 जानेवारी लोकसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये येत्या 27 तारखेला बैठक होत आहे. पण त्यापूर्वीच 24-24 जागांचा कोटा वाटून घ्यायचा यावर दोन्ही काँग्रेसच्या गोटात एकमत झालेले दिसतंय. 26 जागांची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरुवातीला दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण मतदार संघांच्या फेरबदलामुळे राष्ट्रवादीनं आपला पवित्रा मागे घेतला. आता 24 जागांवर समाधान मानण्याची राष्ट्रवादीची मानसिकता झालीय. सध्या राज्यातले 13 ते 14 मतदार संघ राष्ट्रवादीसाठी अनुकूल असल्याचं चित्र आहे.

close