भूपती-सानिया मिक्स डबल्सच्या दुस-या फेरीत

January 23, 2009 2:45 PM0 commentsViews: 1

22 जानेवारी भारताची टेनिस जोडी महेश भूपती आणि सानिया मिर्झाने मिक्स डबल्समध्ये दुस-या फेरीत प्रवेश केला. त्यांनी चेक रिपब्लिकन जोडी पावेल व्हिझनेर-क्वेटा पेस्केचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. भूपती-मिर्झाने पहिल्यापासूनच मॅचवर आपलं वर्चस्व ठेवलं होतं. दुस-या सेटमध्ये सहाव्या सीडेड रिपब्लीकन जोडीने टफ फाईट देण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जोडीने मॅच आरामात आपल्या खिशात टाकली. सानियाचं एकेरीतून आणि डबल्समधून आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे तर भूपतीने डबल्समध्ये दुस-या फेरीत प्रवेश केला आहे.

close