थकबाकी प्रकरणी सहआयुक्तांसह 2 अटकेत

July 19, 2013 10:42 PM0 commentsViews: 188

pune19 जुलै : पुणे महानगपालिकेच्या नगसेविका रेश्मा भोसले यांच्या प्रॉपर्टी टॅक्स थकबाकी प्रकरणात करआकारणी विभागाचे सहआयुक्त दयानद सोनकांबळे यांच्यासह त्यांच्या दोन सहकार्‍यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्यावर्षी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत रेश्मा भोसले यांची प्रॉपर्टी थकबाकी ही निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरण्यात आली होती. पण कॉम्प्युटरच्या डेटाबेसमध्ये फेरफार करून ही रक्कम निवडणुकी पुर्वीच भरल्याचं दाखविण्यात आलं होतं. दरम्यान, महापालिकेची फसवणूक केल्याबद्दल रेश्मा भोसलेवर हा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केलीये.

close