अमरावतीत वैशाली भैसने-माडेसाठी जोरदार प्रचार

January 23, 2009 1:50 PM0 commentsViews: 4

23 जानेवारी, अमरावती धीरज खडसे अमरावती जिल्ह्यातल्या खार-तळेगाव या गावात सध्या जोरदार प्रचार सुरू आहे तो कुणा राजकारण्याचा नाही तर, वैशाली भैसने-माडेसाठी. वैशाली सारेगामापा चॅलेंज 2009 या स्पर्धेच्या अंतीम फेरीत पोहचलीये आणि अख्खं गाव सध्या तिच्या प्रचारात व्यस्त आहे. वैशालीला जास्तीत जास्त अमरावतीकरांनी मेसेज पाठवावेत यासाठी गावभर दवंडी पिटवून प्रचाराचा मेसेज पोचवला जातोय.गावकरी स्वत: SMS करून वोटींग करतायत आणि इतरांनाही SMS करायला प्रवृत्त करतायत. वोटिंग करण्यासाठी आता अगदी कमी वेळ उरलाय. त्यामुळे गावकरी कोणतीही रिस्क घेत नाहीये. अगदी घरोघरी जाऊन जोरदार प्रचार सुरू आहे.वैशालीच्या मेहनतीला तिच्या माहेरचा अगदी भरभक्कम पाठिंबा आहे.. मग तिला काय भिती .. म्हणतात ना गाव करे सो राव ना करे. ती जिंकली पाहिजे आणि इतरांनी तिला जिंकवलं पाहिजे ही अमरावतीकरांची इच्छा आहे.

close