लखनभैया काय संत होता का?-राज ठाकरे

July 20, 2013 3:35 PM0 commentsViews: 3303

Image raj_on_thane_band_300x255.jpg20 जुलै : ‘लखनभैया काय संत होता का?’,वरिष्ठ अधिकार्‍यांचा आदेश आल्याशिवाय पोलीस एन्काऊंटर करतील का? असा संतप्त सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला. आर.आर.पाटलांपासून सगळ्यांना या एन्काउंटरची माहिती नव्हती का? हे सगळे मराठी अधिकारी आहे. पण यात अमराठी अधिकारी बाजूला राहिले आणि मराठी अधिकारी शिक्षा भोगताय हे काही योग्य नाही. सरकारनं आता पोलिसांच्या पाठिशी उभं राहायला हवं, असं आवाहन त्यांनी केलंय. आपण या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना सर्वोतोपरी मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलं.

 डान्सबार बंदी उठवण्याचं समर्थन

राज ठाकरेंनी डान्स बारवरची बंदी उठवण्याच्या निर्णयावरून सरकारवर टीका केली आणि सरकारलाच डान्स बार सुरू व्हावेत असं वाटतंय. जसे एखाद्या वस्तूचे फायदे आणि तोटे असतात तसंच हेही आहे. डान्सबारमुळेच तेलगी सापडला, असंही राज ठाकरे म्हणाले. लखनभैया बनावट एनकाऊंटर प्रकरणात जन्मठेप झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे नातेवाईक राज ठाकरे यांची भेट घेतली. आणि त्यांनी मदतीची मागणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी राज्य सरकारवर तोफ डागली.

close