राम गणेश गडकरी यांचा 90 वा स्मृतिदिन

January 23, 2009 2:57 PM0 commentsViews: 40

22 जानेवारी नागपूरअखिलेश गणवीर ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा 90 वा स्मृतिदिन. एकच प्याला ही त्यांची अजरामर कलाकृती या थोर साहित्यिकाचं काही लेखनकार्य नागपूरच्या सावनेर तालुक्यात झालं. तसंच अखेर त्यांची प्राणज्योतही इथंच मालवली. नागपूरच्या सावनेर तालुक्यात ज्येष्ठ साहित्यिक राम गणेश गडकरी यांची वास्तू आजही अनेकांना प्रेरणा देते. पुरातत्त्व विभागानं या वास्तूचा ताबा 1990 मध्ये घेतला. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नाटकातील काही प्रसंगांची छायाचित्रं इथं लावण्यात आली आहेत. गडकरी यांनी जी साहित्यसंपदा आणि नाटकं निर्माण केली, त्यामुळेच त्यांना उत्तंुग प्रतिभेचा सम्राट म्हटलं जातं.राम गणेश गडकरी अल्पायुषी होते. पण त्यांच्या साहित्यनिर्मीतीनं मात्र त्यांना अजरामर केलंय. रंगभूमीवर गाजलेल्या त्यांच्या नाटकांनीच त्यांचं खरं महत्त्व लोकांना कळलं.

close