‘पंतप्रधानपदाचा निर्णय भाजपच्या निर्णयानंतरच’

July 20, 2013 4:25 PM0 commentsViews: 344

Image udhav_thakare_on_balasaheb_smark453434_300x255.jpg20 जुलै: पंतप्रधानपदावर जेव्हा चर्चा होईल तेव्हा आम्ही आमचं मत मांडू, त्या अगोदर भाजपची बैठक होईल ते काय निर्णय घेतात त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. तसंच भाजप नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा नाही.

 

नितीशकुमार हे जेव्हा आमच्याबरोबर होते तेव्हा त्यांना हिंदुत्व खटकत नव्हतं. आमची युतीच मुळात हिंदुत्वाच्या मुद्यावर झालीय. हिंदुत्त्व म्हणजे फक्त भगवे झेंडे नाहीत तर विकास आहे. आमच्या काळात जेवढा विकास झाला तेवढा विकास इतरांच्या काळात झाला नाही. हिंदुस्तानात मी हिंदू आहे असं म्हणण्यात चूक काय…? असं पुन्हा एकदा उद्धव यांनी ठणकावून सांगितलं.

 

जर आम्ही हिंदुत्ववादी आहोत तर मग जे स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतात त्यांनी देशाची काय वाट लावलीय ते पाहा असा टोलाही उद्धव यांनी लगावला. उद्धव ठाकरे दिल्ली दौर्‍यावर आहेत. आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

close