पक्षाच्या निर्णयावर नाराज नाही -गडकरी

July 20, 2013 2:49 PM0 commentsViews: 430

Image img_229692_nitingadkari3562_240x180.jpg20 जुलै: भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यावेळी कारण होते ते दिल्लीतील निवडणुकींची जबाबदारी. पण पण पक्षानं दिलेली जबाबदारी आपल्याला मान्य आहे. आपण नाराज नाही, असं गडकरींनी स्पष्ट केलं आणि चर्चेला पूर्णविराम दिलाय. भाजपनं शुक्रवारी निवडणूक व्यवस्थापन समितीची घोषणा केलीय. माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचं व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं जाणार आहे. यासाठी त्यांना विनय सहस्त्रबुद्धे मदत करतील. नितीन गडकरी यांच्याकडे दिल्लीतल्या निवडणुकींचीही जबाबदारी देण्यात आलीय. पण गडकरींचा केवळ दिल्लीच्या निवडणूक प्रभारीपद स्वीकारायला विरोध होता. गडकरींना त्यासोबतच त्यांना राजस्थान निवडणुकीचं प्रभारीपद हवं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र त्यांच्याकडे आता केवळ दिल्लीचं प्रभारीपद देण्यात आलंय.

close