‘नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र द्वेषी’

July 20, 2013 2:34 PM5 commentsViews: 2295

20 जुलै: भाजपचे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ठाण्यात ठिकठिकाणी संभाजी ब्रिगेडनं पोस्टर्स लावली आहेत. त्यावर नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र द्वेषी असल्याच्या आशयाचा मजकूर लिहिण्यात आलाय. त्यामुळे संभाजी ब्रिगेडची ही पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय ठरलीय. अलीकडेच पुणे दौर्‍यात एका कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांची आरती केली होती. पण त्याचवेळी महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केली होती. म्हणून संभाजी ब्रिगेडनं नरेंद्र मोदींच्या विरोधात ठाण्यात ही पोस्टर्स लावली आहेत. यामध्ये मराठी मनाला आणि महाराष्ट्राच्या शौर्याला नरेंद्र मोदींनी कमी लेखू नये असा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे पोस्टरवर मजकूर?
उत्तराखंडमध्ये 15,000 गुजराथी बांधवांना आपण वाचवले. पण, भारतीयांना मात्र आपण विसरलात. हे कबूल की, गुजराथी धंद्यामध्ये खूप मोठे आहेत. पण मराठी माणसाने परीश्रमातून घाम गाळून महाराष्ट्र मोठा केला. हा देश तुम्हांला धंदा करण्यासाठी सुरक्षित ठेवला आणि म्हणूनच आज धंद्यामध्ये तुम्ही 80 टक्के आहात. धंदा सुरक्षित ठेवण्यासाठी देश सुरक्षित असायला हवा. देश सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर लढणार्‍यांमध्ये आम्ही “मराठी” 80 टक्के आहोत. “मराठा” व “महार” या नावाने 2 मराठी माणसांच्या रेजीमेंट भारतीय सैन्य दलात आहेत. हा देश सुरक्षित आहे. म्हणूनच तुम्ही धंदा करु शकता याची आठवण असावी. देश सुरक्षित तर धंदा सुरक्षित ! -संभाजी ब्रिगेड

 • Kunal Bhardwaj

  काँग्रेसने, हिंदू आणि मुसलमान यांमाद्धे फूट पडली … आणि आता हे मुर्ख संभाजी ब्रिगेड वाले मराठी आणि गुजराथी यांमाद्धे फूट पडत आहेत … काय मूर्खपणाचा बाजार मांडलाय ह्यांनी !!!

 • प्रथमेश

  नरेंद्र मोदींना थेट विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे लोकांना मुद्दा सापडत नाहीये म्हणून आता ब्रिगेडला पुढे करणे सुरु झाले आहे. हे कळायला मराठी जनता मूर्ख नाही.

 • Manoj

  Sambhaji brigade is Maharastra Dweshi and Hindu Dweshi, helping NCP who is distroying Maharashtra.

 • shree

  navin javaishodh aju kiti nich patlivar janar ahat????

 • sanjay keny

  narendra modi ajun gujarat che c.m. ahet. mag tyni gujrati mansana vachavle tar kay vegli goshta keli…..ikde amche mantri bagha …tyana fakta ekch diste paisa adva paisa jirva…..ghotalyavar ghotale kartat….utarakhand gele udat..

close