‘भाग मिल्खा भाग’ची आता टॅक्स फ्री दौड

July 20, 2013 8:01 PM1 commentViews: 590

bhag milkha bhag19 जुलै : ‘फलाईंग शिख’ मिल्खा सिंग यांच्या जीवन प्रवासावर आधारीत ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाला करमणूक करातून सूट देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतला. तरुणांना क्रिडाविषयक आवड निर्माण करणे आणि प्रोत्साहन मिळावा म्हणून सहा महिन्यांसाठी हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम 1993 मधील कलम 6(3) अन्वये राज्य शासनाला प्राप्त अधिकारान्वये आजपासून या सिनेमाला सहा महिन्याच्या कालावधीसाठी करमणूक शुल्क माफ करण्यात आलं आहे. दोन दिवसांपुर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश मेहरा आणि अभिनेता फरहान अख्तर यांनी विधिमंडळात जाऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. हा चित्रपट मनोरंजन करमुक्त केला तर जास्ती लोक हा चित्रपट पाहू शकतील असं दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी विनंती केली होती. यामधून जे पैसे जमा होतील त्याचा उपयोग राज्यातील खेळाडूंसाठी केला जाईल असंही मेहता यांनी सांगितलं होतं.

  • Manoj

    Ajab tujhy Sarkaer. , Congress/NCP. Tax concession for Film which is collecting Rs. 100 crores, for IPL but no relief for poor people , Toll Dhad is in full form, looting Maharashtra.

close