चायनीज खेळण्यांवर बंदी

January 23, 2009 5:35 PM0 commentsViews: 2

22 जानेवारी बाजारात मिळणारी आकर्षक आयडियाबाज चायनीज खेळणी मिळणं आता मुश्कील होणार आहे, कारण सरकारनं चायनीज खेळण्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. किमान सहा महिने तरी ही बंदी राहणार आहे. या हलक्या आणि स्वस्त दर्जाच्या चायनीज खेळण्यांनी भारतीय मार्केटमध्ये चांगलेच हात-पाय पसरले आहेत. परंतु यामुळे देशातल्या खेळणी उत्पादकांना फटका बसतोय. सरकारनं या बंदीमागे कोणतंही कारण दिलेलं नाही. पण देशातल्या खेळणी निर्मात्यांना असणारी ही चायनीज खेळण्यांची स्पर्धा संपवावी म्हणून ही बंदी घातली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या चायनीज खेळण्यांमध्ये लहान मुलांना विघातक असे घटक असल्याचंही यापूर्वी आढळलं होतं. चीनमधल्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये मेलामाईन नावाचं घातक रसायन असल्यामुळे या पदार्थांच्या आयातीवर सरकारची बंदी आहेच.

close