क्रीडा संकुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

July 20, 2013 10:09 PM0 commentsViews: 219

20 जुलै : मुंबईतल्या क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमींसाठी महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा धोरणातंर्गत उभारण्यात आलेल्या क्रीडा संकूलाचं लोकापर्ण आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं.23 कोटी रुपये खर्चुन धारावी इथं हे 3 मजली क्रीडा संकूल उभारण्यात आलंय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: कॅरम, चेस आणि टेबलटेनिस खेळाचा आनंदही लुटला. या क्रीडा संकुलात इनडोअर आणि आऊट डोअर गेम्ससाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधाही देण्यात आल्यात. दरम्यान, या क्रीडा संकुलाला राजीव गांधी यांचं नाव देण्यात यावं अशी विनंती महिला आणि बालकल्याण विकासमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

close