..आणि सीताबाई परत आल्या !

July 20, 2013 10:14 PM0 commentsViews: 181

20 जुलै : हरवलेली व्यक्ती परत सापडण्याच्या घटना फारच कमी असतात…अशीच एक घटना चाळीसगावात घडलीयं. चाळीसगाव तालुक्यातील वळठाण गावात राहणार्‍या पन्नास वर्षांच्या सीताबाई सोनावणे ह्या मनोरुग्ण आहेत. सीताबाई पाच वषांर्पूर्वी हरवल्या होत्या. घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. पण काही केल्या त्या सापडल्या नाहीत. अखेरीस त्या सापडल्या.. पण थेट पाकिस्तानात! पाकिस्तानातील लाहोरमध्ये त्या मनोरुग्ण अवस्थेत पोलिसांना सापडल्या. त्यांनी तिला सामाजिक संस्थांकडे सोपवलं. पाकिस्तानातील सामाजिक संस्थांनी अमृतसर येथील रेड क्रॉस संस्थाशी संपर्क साधू सीताबाईच्या कुटुंबाचा शोध घेतला. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. सीताबाईंना फक्तं त्यांच्या गावाचं नाव आणि चाळीसगाव सांगता आलं होतं. त्यावरुन शोध घेतला गेला. आणि सीबीआयच्या अधिकार्‍यांनी चौकशी करुन सीताबाईंना पाकिस्तान सरकार कडून परत भारतात आणण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केली. मगच सीताबाई वाघा बॉर्डर ला नऊ जुलै रोजी भारतात आल्या. आणि त्यांना आणन्यासाठी त्यांचा मुलगा संजय सोनावणे गेला होता. त्यानंतर बारा जुलै रोजी सीताबाई त्यांच्या गावातील घरी आल्या. पाच वर्षांपुर्वी हरवलेल्या सीताबाईंच्या स्वागताला गावकर्‍यांनी चांगलीच गर्दी केली होती.

close