करुणानिधींनी दिला केंद्र सरकारला अल्टीमेटम

January 23, 2009 11:48 AM0 commentsViews: 1

22 जानेवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत बरी नसल्यामुळे युपीए चिंतेत आहे. तर दुसरीकडे तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांनी युपीएला अल्टीमेटम दिलाय. श्रीलंका सरकार आणि लिट्टे यांच्यात शस्त्रसंधी होण्याची हमी सरकारनं द्यावी. अन्यथा डीएमके युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेईल, अशी धमकी त्यांनी दिलीय. केंद्राला ही शेवटचीच विनंती असल्याचं करुणानिधींनी म्हटलं आहे. श्रीलंकेतल्या प्रश्नात भारत सरकारनं हस्तक्षेप करावा, अशा आशयाचा ठराव तमिळनाडू विधानसभेत संमत करण्यात आला. श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्रानं तात्काळ पावलं उचलावीत, अशी विनंतीही करुणानिधी यांनी केली आहे.

close