लोकलमधून पडून एकाचा मृत्यू

July 22, 2013 4:33 PM0 commentsViews: 1449

22 जुलै : दर रविवारी मेगाब्लॉक मुंबईकरांना काही नवा नाही. पण त्यामुळे गाड्यांना होणारी गर्दी हा प्रवाशांसाठी तापदायक प्रकार ठरू लागलाय. त्यातच आणखी काही तांत्रिक अडचणी आल्या तर गाड्यांना अनावर गर्दी होऊन प्रवाशांच्या जीवावर बेतण्याच्या घटनाही घडतात. रविवारी लोकलला जबरदस्त गर्दी झाल्यामुळे चालत्या गाडीतून तिघंजण पडले, त्यातल्या एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर स्टेशनजवळ रविवारी संध्याकाळी सात वाजता हा अपघात झाला. जखमींवर धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर लोकलचा डबा घसरल्याने जवळपास चार तास रेल्वे वाहतूक खोळंबली होती. कर्जत, नेरळ, वांगणी, बदलापूर या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती. त्यानंतर रेल्वे सुरू झाल्याने गाडीला खूप गर्दी होती. त्यात मेगाब्लॉकचीही भर पडली.

close