पंतप्रधानांवरील ऑपरेशनला सुरुवात

January 24, 2009 8:27 AM0 commentsViews: 1

24 जानेवारी, दिल्लीआशिष दीक्षितपंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील ऑपरेशनला सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन होत आहे. एकूण अकरा डॉक्टर या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत. डॉक्टरांच्या या टीमचं नेतृत्व रमाकांत पांडा करत आहेत. पांडा यांच्यासह डॉ. संपतकुमार, डॉ.एस.रेड्डी, डॉ. विजय डिसिल्वा, डॉ. नरेंद्र यांचाही सहभाग आहे. मनमोहन सिंग यांच्या गैरहजेरीत प्रणव मुखर्जी देशाचा कारभार चालवतील. प्रणव मुखर्जी आता काही दिवस अर्थ मंत्रालयाचंही काम पाहणार आहेत. 76 वर्षांच्या मनमोहन सिंग यांना पूर्ण बरं व्हायला अजून दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल, असं एम्समधल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे

close