डान्सबार बंदीसाठी अध्यादेश?

July 22, 2013 4:36 PM0 commentsViews: 949

22 जुलै : राज्यातली डान्स बार बंदी सुप्रीम कोर्टाने उठवल्यानंतरही डान्स बार बंदच ठेवण्याची सरकारची भूमिका आहे. डान्सबारसंदर्भात राज्य सरकार नव्याने अध्यादेश काढण्याची तयारी करतंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात रिव्ह्यु पिटीशन किंवा क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात अर्थ नाही असा सल्ला या प्रकरणातील राज्य सरकारचे वकील हरीश साळवे यांनी दिलंय. त्यामुळे कायद्यातल्या त्रुटी दूर करून नवा अध्यादेश काढण्याची तयारी राज्य सरकारने चालवलीय. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सरकार कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असून लवकरच ठोस निर्णय जाहीर करेल, असं सांगितलं. तर डान्सबारबाबत याच अधिवेशनात विधेयक आणा आणि कायदा करा, अशी मागणी भाजपनं केलीय.

close