पुण्यात तवेरा आणि ट्रकचा अपघात : 6 ठार, 4 जखमी

January 24, 2009 4:45 AM0 commentsViews: 7

24 जानेवारी, पुणे मनोहर बोडके पुणे जिल्ह्यातल्या केडगाव-चौफुला इथं दौंडजवळ तवेरा आणि ट्रकच्या अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार, तर चार जण जखमी झालेत. ठार झालेले सर्वजण मुंबईचे रहिवासी आहेत. जखमींना दौंडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ठार झालेल्यांमध्ये एका चार महिन्यांच्या लहान मुलीचा समावेश आहे.अपघातात सापडलेल्या जखमींमध्ये पाटील आणि कोल्हे आणि कुटुंबीयांचा समावेश आहे. तवरातले प्रवासी हे मुंबईतल्या लालबाग भागातले रहिवसी आहेत. ते अष्टविनायक यात्रेसाठी मोरगाव चालले होते. समोरून येणा-या ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक सुसाट वेगानं येणा-या तवेरावर धडकला. ती धडक इतकी जोरदार होती की 6 जण जागीच ठार झाले आहेत.

close