खड्‌ड्यांमुळे महिलेला गमवावा लागला जीव

July 22, 2013 9:15 PM0 commentsViews: 733

22 जुलै : रस्त्यात पडलेल्या खड्‌ड्यांमुळे एका महिलेला जीव गमवावा लागलाय. वसईच्या गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये या महिलेचा मृत्यू झाला. आशा डमडेरे असं या महिलेचं नाव आहे. शुक्रवारी वसईत आशा डमडेरे आपल्या मुलीसोबत होंडा ऍक्टिव्हा गाडीवरून जात होत्या. त्यावेळी अप्पा गार्डनजवळून जात असताना खड्‌ड्यामुळे अपघात होऊन त्या गाडीवरून पडल्या. हेल्मेट नसल्यानं आशा डमडेरेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डमडेरेंचे पती तानाजी डमडेरे यांनी आपल्या पत्नीचा मृत्यू रस्त्यातल्या खड्‌ड्यांमुळे झाल्याची तक्रार
पोलिसांत दाखल केलीये. आतापर्यंत या खड्‌ड्यांमुळे तीन जणांना जीव गमावावा लागलाय. महापालिकेने या वर्षी खड्डे बुजवण्यासाठी 60  कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण तक्रार करुनही पालिका खड्डे बुजवत नाहीये त्यामुळे आता स्थानिकनागरीकांनीच खड्डे बुजवायला सुरवात केली आहे.

close