‘साई पार्क’चा वाद आता कोर्टात

July 22, 2013 9:47 PM0 commentsViews: 231

sai pune22 जुलै: पुण्यातील बानेर भागातील साई पार्क ले आऊटचा वाद आता कोर्टात जाऊन पोहचला आहे. साई पार्क ले आऊटमध्ये आमदार विनायक निम्हण आणि त्यांचा मुलगा सनी निम्हण जमीन बळकावत असल्याचा आरोप अन्य प्लॉटधारकांनी केला. या ले आऊट मधल्या पाच प्लॉट धारकांनी न्यायालयात दावा दाखल केलाय. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने एक चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीने साई पार्क ले आऊटची पाहणी केली. ही चौकशी समिती आपला अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. या चौकशीच्या वेळी सनी निम्हणसह सर्व प्लॉट धारक उपस्थित होते. सनी निम्हण न्यायालयीन चौकशी समितीची दिशाभूल करत असल्याचा आरोप इतर प्लॉट धारकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणात विनायक निम्हण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पण या भेटीचा तपशील कळू शकला नाहीये.

close