‘नगरसेविका रेश्मा भोसलेंना अटक करा’

July 22, 2013 9:54 PM0 commentsViews: 713

MNS Pune22 जुलै : पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नगसेविका रेश्मा भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने शिवाजी नगर चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसेच्या 8 नगरसेवकांसह 43 जणांना अटक करण्यात आली.

गेल्यावर्षी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत रेश्मा भोसले यांची प्रॉपर्टी टॅक्सची थकबाकी ही निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरण्यात आली होती. पण कॉम्प्युटरच्या डेटाबेसमध्ये फेरफार करून ही रक्कम निवडणुकी पुर्वीच भरल्याचं दाखविण्यात आलं होतं. या प्रकरणात कर संकलन विभागाच्या अधिकार्‍यावरच गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.

पण पालिकेकडून रेश्मा भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पुणे महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस रेश्मा भोसले विरोधात बोटचेपी भुमिका घेत असल्यामुळे त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात येतेय.

close