पंतप्रधानांवरील बायपास सर्जरी यशस्वी

January 24, 2009 11:20 AM0 commentsViews: 3

24 जानेवारी दिल्लीपंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्यावर दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी करण्यात आली. पंतप्रधानावरील बायपास सर्जरी यशस्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे. हे ऑपरेशन दुपारी 3.15 ला संपलं. ऑपरेशन जवळ जवळ सात तासापेक्षा जास्तवेळ चाललं.आता डॉ.मनमोहनसिंग यांना सीसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. पंतप्रधानांवर बायपास सर्जरी करण्यासाठी डॉ.पांडासह 11 डॉक्टरांच्या टीम होती. पंतप्रधानांवरील आपॅरेशनच्या माहितीचं मेडिकल बुलेटीन एम्सचे डॉक्टर संध्याकाळी सात वाजता प्रसारित करणार आहेत.

close