रत्नागिरीच्या थिबा पॅलेससमोर संगीत महोत्सव सुरू

January 24, 2009 10:22 AM0 commentsViews: 4

24 जानेवारी रत्नागिरीमहेश केळुसकररत्नागिरीच्या थिबा पॅलेससमोर तीन दिवसांचा संगीत महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवाची पहिली रात्र बहरली ती विख्यात बासरी वादक राकेश चौरासिया आणि तबला नवाझ विजय घाटे यांच्या जुगलबंदीने. चौरासिया यांनी या जुगलबंदीत राग हेमवती, देस आणि पहाडी रागातील नजाकत पेश केली. विख्यात तबला वादक पंडित सुरेश तळवलकरांचे शिष्य विजय घाटे यांनी तर या मैफिलीत आणखीनच रंग भरले. रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या या जुगलबंदीत रत्नागिरीकर रसिक तल्लीन झाले होते.रत्नागिरीच्या आर्ट सर्कल या संस्थेने या संगीत महोत्सवाचं आयोजन केलं आहे.

close