आयपीएलने आसिफबाबतचा निर्णय राखून ठेवला

January 24, 2009 2:08 PM0 commentsViews: 3

24 जानेवारी पाकिस्तानचा क्रिकेटर महम्मद आसिफची सुनावणी आयपीएल ट्राब्यूनल समोर झाली. पण ट्राब्यूनलने आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. सुनील गावस्कर, डॉक्टर रवी बापट आणि ऍडव्होकेट शिरीष गुप्ते यांच्या पॅनलने आसिफची चौकशी केली. आसिफ त्याच्या वकिलांसह सुनावणीसाठी हजर झाला. आयपीएल स्पर्धे दरम्यान आसिफने उत्तेजक द्रव्य घेतल्याचं सिद्ध झालं होतं. आणि त्यासाठी त्याची सुनावणी सुरू आहे. आसिफला नक्की किती शिक्षा होते हे या सुनावणीनंतर ठरणार आहे. दिल्ली डेअर डेव्हिल्स टीममधून आसिफची यापूर्वीच हकालपट्टी झाली आहे. आणि या प्रकरणात आसिफला होणारी शिक्षा आयपीएल पुरती असेल.पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये जागा मिळवण्याचा निर्धार आसिफने यापूर्वीच बोलून दाखवला आहे.

close