विजापूरजवळ भीषण अपघातात 18 ठार

July 22, 2013 11:51 PM0 commentsViews: 940

vijapur accdent22 जुलै : विजापूरजवळच्या चिक सिंदगी गावाजवळ खासगी बस आणि जीप यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात 18 जणांचा मृत्यू झालाय. सगळे मृत सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या कांती, बागेवाडी, बसप्पावाडी आणि कोकले या गावातले रहिवासी आहेत. गुरूपौर्णिमेनिमित्त गाणगापूरच्यादत्तात्रयाच्या दर्शनाला हे सारे प्रवासी गेले होते. दर्शन करून सांगलीला परतत असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात जीपचा चक्काचुर झाला. जीप आणि बसमध्ये समोरासमोर ही टक्कर झाली. अपघातानंतर जीपला अक्षरश: जेसीबीच्या साह्याने बसच्या खालून बाहेर काढावे लागले.जखमींना विजापूरच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

close