काँग्रेस कार्यकर्त्यांची दादागिरी, हॉटेल पाडलं बंद

July 23, 2013 4:59 PM9 commentsViews: 1202

aditya restorant23 जुलै : केंद्रातल्या यूपीए सरकार विरोधात हॉटेल बिलाच्या पावतीवर टिप्पणी केल्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परळचं अदिती रेस्टॉरंट बंद पाडलं. ही घटना सोमवारी दुपारी घडली होती. गणेश कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या 30 ते 35 कार्यकर्त्यांनी आंदोलन करत हे हॉटेल बंद करायला लावलं.

 

 

 

 

त्यामध्ये काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरही सहभागी झाले होते. यूपीए सरकारच्या धोरणानुसार 2 जी, कोळसा, कॉमनवेल्थ या सारख्या घोटाळ्यांमध्ये पैसे खाणं ही गरज आहे. तर हॉटेलच्या एसी रूममध्ये बसून जेवणं ही चैन आहे. असा मजकूर या अदिती हॉटेलच्या मालकानं बिलाच्या पावतीवर छापलाय. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलच बंद पाडलं.

 • Sarang kadam

  अदिती हॉटेलच्या मालकाला माझा सलाम आहे . ह्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना खरं बोलेलें खूपच झोंबले आहे वाटे .

 • sk

  Mirchya zombalya watata congress walyana…

 • Comman Man

  असे काय चुकीचे लिहीले त्यांनी ….उद्या न्याया लयाने ताशेरे ओढले की हे न्यायालय तोडनार का?

  • Ek nagarik

   nyayalayane yaanna 100 vela thobadale asel…. gendya chya katadiche zaalet te…. kahi farak padat nahi…

 • Deelip

  हि तार सरासर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. व्यावसायिक असला तरी त्याला आपले मत लिहायचे स्वतंत्र आहे.

 • Deelip

  हि तार सरासर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. व्यावसायिक असला तरी त्याला आपले मत लिहायचे स्वतंत्र आहे.

 • BHUPENDRA

  KHARACH AWGAD AAHE

 • sandip

  हि तार सरासर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. व्यावसायिक असला तरी त्याला आपले मत लिहायचे स्वतंत्र आहे.

 • Ek nagarik

  khar lihal tar kaay mirachya lagalya yaana……. yaala ch mhanataat ka lokshahi……

close