कोकण रेल्वे ठप्प होण्याच्या मार्गावर?

July 23, 2013 1:46 PM0 commentsViews: 698

kokan train23 जुलै : कोकणात मुसळधार पावसामुळे जमीन खचल्यानं कोकण रेल्वेला फटका बसला आहे. रत्नागिरीतल्या निवसरजवळच्या कोंडवी डोंगराला भेगा पडल्यामुळे टाकलेला भराव खचलाय आणि रेल्वे ट्रॅकचं नुकसान झालंय. हा रेल्वे ट्रॅक खचल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक मंदावली असून कोंडवी जवळ ताशी 10 किमी वेगाने रेल्वे सोडण्यात येत आहे. हा पाऊस असाच आणखी वाढला तर हा डोंगर आणखी खचून कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. ट्रॅक दुरुस्तीचं काम सुरू असून भराव सतत खचत असल्यामुळे वर उचललेला ट्रॅकही पुन्हा खचला जातोय.

 

कोल्हापुरात धरणं फुल्ल

 

कोल्हापुरातल्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण 100% भरलंय. धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे चार दरवाजे उघडण्यात आलेत. भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होतेय. नदीकाठच्या सगळ्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चंदगड, आजरा, शाहुवाडीत संततधार आहे. राधानगरी धरणाचे ओव्हर फ्लो होणारे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातल्या एका दरवाज्यातून अडीच हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय. तर पावसाचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम होतोय. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद झालाय. या रस्त्यावर नेळे गावाजवळ रस्त्यावर झाडं पडल्यानं रस्ता बंद झालाय. तर इथला पर्यायी रस्ता बंद असल्यानं वाहतूक खोळंबली आहे.

close