विदर्भात पावसाचा कहर

July 23, 2013 2:49 PM0 commentsViews: 709

vidharbh rai ntoday23 जुलै : राज्यभरात तुफान पाऊस सुरू आहे. पण विशेषतः पूर्व विदर्भात परिस्थिती चिंताजनक आहे. गडचिरोलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. अहेरी तालुक्यातला मोठा तलाव फुटला आहे. यामुळे आजुबाजुच्या परिसरात पाणी घुसलंय. तसंच परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोलीतल्या कडेम धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 28 हजार क्युसेक पाणी या धरणातून सोडलंय. आंध्रप्रदेशच्या आदीलाबाद जिल्ह्यातलं हे कडेम धरण आहे. त्यामुळे गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनानं या भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय्. चंद्रपुरात पाऊस वाढलायं. त्यामुळे सखल भागात पुन्हा पाणी साचायला सुरुवात झालीय. अहेरी आणि सिंरोंचात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. IBN लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनानं दखल घेत भर पावसात रात्रभर काम करुन या भागातला वीजपुरवठा पूर्ववत केलाय. सुमारे 20 तासांनंतर हा वीज पुरवठा सुरूळीत झालाय.

 

वर्ध्यात संततधार सुरूच

 

वर्ध्यातही रात्रभर पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या दोन तासांपासून वर्ध्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. लोअर वर्धा धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर अप्पर वर्धा धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आलेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतचा इशारा देण्यात आलाय. येत्या 48 तासांत वर्ध्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

close