सत्ता हाती द्या- राज ठाकरे

January 24, 2009 4:28 PM0 commentsViews: 8

24 जानेवारी ठाणेमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाणे इथल्या भाषणाची सर्वांना उत्सुकता लागली होती. परंतु राज ठाकरे यांच्या भाषणात नवीन कोणतीच घोषणा न झाल्यामुळे भाषण ऐकणा-यांची निराशा झाली.अमराठी माणसासाठी कितीही वेळा जेलमध्ये जाईन, पण या मुद्यावर मागे हटणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं. सत्ता हाती दिल्यास महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकीन, असा दावाही त्यांनी केला. यावेळी नेहमीप्रमाणे त्यांनी उत्तरभारतीयांवर कडाडून हल्ला केला. आपल्या शैलीत त्यांनी लालूप्रसाद यादव आणि मायावतीचा समाचार घेतला. महाराष्ट्रातल्या खासदारांनी संसदेत मराठीचा मुद्दा उचलला नसल्याबद्दल त्यांनी टीका केली. तसंच राज्य सरकारलाही नेहमीसारखंच फटकारलं. या भाषणात त्यांनी हिंदी, इंग्रजी मीडियावर तोंडसुख घेतलं. पण, त्यांच्या भाषणात नवीन असं काहीच नव्हतं. त्यामुळे नवीन काहीतरी ऐकण्याच्या अपेक्षेनं आलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांनी कोणताही कार्यक्रम जाहीर केला नाही. राज ठाकरे यांच्या ठाणे इथल्या सभेमुळे कायदा आणि सुव्यावस्तेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून पोलिसांनी 19 अटी घालण्यात आल्या होत्या.

close