‘फाईल गहाळ प्रकरणात तथ्य आढळल्यास हवी ती चौकशी करू’

July 23, 2013 5:55 PM0 commentsViews: 135

Image img_239812_cmonreccors_240x180.jpg23 जुलै : मुंबई महापालिका फाईल्स गहाळ प्रकरणी नगरविकास खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती नेमण्यात येणार आहे. आणि त्यात अतिरिक्त सचिवांचा समावेश करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंबंधी विधानसभेत ही घोषणा केली. या समितीच्या चौकशीत तथ्य आढळल्यास विरोधकांना हवी ती चौकशी करू असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सध्या याप्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणाची नांदगावकर यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

close