इंद्रायणी नदीत कार कोसळली

July 23, 2013 8:15 PM0 commentsViews: 2441

23 जुलै : पुण्यात आळंदीच्या पुलावरून कठडा तोडून एक तवेरा कार दुथडी भरून वाहणार्‍या इंद्रायणी नदीत कोसळलीय. या गाडीत 7 जण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास ही दुदैर्वी घटना घडलीय. दुथडी भरून वाहणार्‍या नदीत कार कोसळल्यानंतर कार मधून दोघे जण बाहेर आले होते. त्यांना वाचवण्यासाठी रिक्षाचालकांनी प्रयत्न केला पण त्यांना यात अपयश आलं. नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे कार वाहून गेली असावी अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुपारपासून या कारचा शोध घेतला जात आहे पण अजूनही या कारचा शोध लागलेला नाही. ग्रामीण पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान शोधकार्य करत आहे. घटनास्थळावर आता एनडीआरएफचे जवान पोहचले आहेत. कार आणि प्रवाशांना शोधकार्य सुरू आहे.

close