वर्ध्यामध्ये कालव्याच्या कामाचं स्लॅब कोसळून 8 जण ठार

January 24, 2009 9:53 AM0 commentsViews: 2

22 जानेवारी वर्धावर्धा जिल्ह्यातल्या पुलगावमध्ये कालव्याच्या कामाचं सेंट्रिंग कोसळून 8 जण ठार झाले आहेत. ढिगा-याखाली आणखी काहीजण दबल्याचं बोललं जातं आहे. जखमी झालेल्या नऊ जणांवर सध्या पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय गोपाल मार्गावर सोनारा ढोक इथं या कालव्याचं काम सुरू होतं. वर्धा प्रकल्पावर पुलाचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.

close