तुरीच्या दोन लाख गोण्यांना लागली बुरशी

July 23, 2013 8:47 PM0 commentsViews: 315

23 जुलै : नवी मुंबईमधल्या तुर्भे इथं सेंट्रल वेअर हाऊसमध्ये तुरीच्या दोन लाख गोण्यांना बुरशी लागलीय. एमएमटीसीने चार वर्षांपूर्वी खरेदी केलेली 600 टन तूर या वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आलीय. ही संपूर्ण तूर आता सडलीय आणि त्यामुळे ती खाण्या योग्य राहिलेली नाही. अनेक वेळा सेंट्रल वेअर हाऊसच्या अधिकार्‍यांनी एमएमटीसीला पत्रव्यवहार करून धान्य सडल्याची माहिती दिली होती. पण अद्यापही हे धान्य त्यांनी उचललं नाही. आता तर नवी मुंबई झालेल्या मुसळधार पावसामुळे संपुर्ण वेअर हाऊस पाण्यानं वेढलं गेलंय. त्यामुळे हे पाणी वेअरहाऊसमध्ये जाण्याची शक्यता वाढलीय. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

close