रामनाथ गोएंका पुरस्कारात IBN लोकमतची हॅटट्रीक

July 23, 2013 10:29 PM0 commentsViews: 138

23 जुलै : पत्रकारितेतल्या प्रतिष्ठेच्या रामनाथ गोएंका पुरस्कारात आयबीएन-लोकमतनं हॅटट्रीक साधलीय. आयबीएन-लोकमतच्या ‘गर्जा महाराष्ट्र’ या कार्यक्रमासाठी कमलेश देवरुखकर आणि अरुण पेडणेकर यांचा रामनाथ गोएंका पुरस्कारनं सन्मान करण्यात आलाय. नवी दिल्लीत झालेल्या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच आयबीएन नेटवर्कनंही या पुरस्कारांत पुन्हा बाजी मारलीय. सीएनएन-आयबीएनच्या रुपश्री नंदा, स्मृती अडवाणी, प्रियंका दुबे, मुफ्ती इस्लाह यांनाही हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालाय. सीएनबीसी टीव्ही 18 (CNBC TV 18)च्या लता वेंकटेश आणि आयबीएन-7 च्या स्मिता शर्मा यांचाही या पुरस्कारानं गौरव झालाय.

close