दिल्लीत दोन अतिरेकी ठार

January 25, 2009 4:48 AM0 commentsViews:

25 जानेवारी, दिल्लीप्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी दिल्ली जवळ नोएडामध्ये दोन पाकिस्तानी अतिरेक्यांचा एन्काउंटर करण्यात आलं. उत्तर प्रदेश एटीएसने सेक्टर शंभरमध्ये या अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. हे दोघेही पाकिस्तानचे नागरिक आहेत.त्यांच्याजवळ दोन एके सत्तेचाळीस आणि पाच हॅन्डग्रेनेडसही सापडले आहेत. पोलिसांच्या तपासात या अतिरेक्यांकडे पाकिस्तानी पासपोर्टही मिळाले. त्यांच्या जवळ आरडीएक्सचा साठाही ही सापडला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांचा मोठा कट उधळण्यास पोलीस यशस्वी झाले आहेत.

close