अरेच्च्या, देशात गरिबी घटली !

July 23, 2013 11:03 PM3 commentsViews: 587

garibi23 जुलै : एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय तर दुसरीकडे नियोजन आयोगाने देशातली गरिबी कमी झाल्याचा दावा केला आहे. 2009-10मध्ये देशात 29 पूर्णांक 8 म्हणजे जवळपास तीस टक्के लोक गरीब होते. पण, हे प्रमाण आता 22 टक्क्यांवर आल्याचा अहवाल नियोजन आयोगानं दिलाय. आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात 25 पूर्णांक 7 टक्के तर शहरी भागात 13 पूर्णांक 7 टक्के लोक गरीब आहेत.

तसंच दरवर्षी 2 कोटी लोक गरिबीतून वर येत आहेत, असाही निष्कर्ष नियोजन आयोगानं काढलाय. विशेष म्हणजे मागिल वर्षी नियोजन आयोगाने शहरात दिवसाला 29 रुपये कमाई करणार आणि आणि ग्रामीण भागात 22 कमाई करणार माणूस श्रीमंत आहे असा अजब अहवाल दिला होता. हेच नाही तर या अगोदरही आयोगाने शहरात दिवसाला 32 रुपये खर्च करणारा माणूस गरीब म्हणता येणार नाही आणि ग्रामीण भागात 26 रुपये कमावणार गरीब नाही अशी व्याख्याच केली होती. आयोगाच्या या अहवालामुळे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेक सिंह अहलूवालिया यांच्यावर चौफेर टीका झाली होती. आता आयोगाने गरिबी घटली असं प्रमाणपत्र दिलंय.

  • yogesh agaj

    27 rupayat netyacha gutkha pan tari bhetat ka??????

  • Sudhir Dakare

    Far rag ala ahe na .Hach rag Matpetitun dakhava.Bharat deshatil manse hinsachari nahit

  • Prakash

    Niyogan ayogacha chairman monty sing ahluwaliya ha veda ahe

close