‘मोदींना व्हिसा देऊ नका’, ओबामांना 65 खासदारांचं पत्र

July 23, 2013 10:57 PM2 commentsViews: 641

Image modi36367g_300x255.jpg23 जुलै : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर आणखी एक अडचण निर्माण झालीय. अमेरिकेनं मोदींवर घातलेली व्हिसा बंदी कायम ठेवण्याची मागणी भारतीय खासदारांनी केलीय. भारतातल्या 12 पक्षांच्या 65 खासदारांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना तशी पत्रं लिहिली आहेत. यात राज्यसभेतल्या 25 तर लोकसभेतल्या 40 खासदारांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. युरोपीयन यूनियन, ब्रिटनसारख्या देशांनी 2002च्या दंगलींचा काळा अध्याय बाजूला सारत मोदींशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न चालवलाय. पण, अमेरिकेनं अजून व्हिसा बंदी मागे घेतलेली नाही. ती मागे घ्यावी, यासाठी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह स्वत: अमेरिकेत जाऊन तिथल्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर समोर आलेलं हे पत्र मोदींसाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे.

  • Sarang kadam

    मोदींची वाढती ताकत बघून ह्यांना आपल्या खुरच्या सोडाव्या लागतील म्हणून हि सगळी कारास्तान चालू आहेत .

  • Gokul

    These activity of MLA is very shameful for an Indian. But there is noting happen about that because Amarica has known the power of MODI JI .

close