छावा उडवणार राजकारण्यांची झोप

January 25, 2009 5:27 AM0 commentsViews: 81

25 जानेवारीआपल्या आंदोलनानं छावा संघटनेनं आता राजकारण्यांची झोप मोडायला सुरुवात केली आहे. या झोपमोडा आंदोलनातून, बेळगावचा प्रश्न लावून धरण्याचं छावा संघटनेनं ठरवलं आहे. त्यांनी आंदोलनांची सुरुवात केली ती,खासदार चंद्रकांत खैरे यांची झोपमोड करून. हातात टाळ घेऊन सकाळीचं छावा संघटनेचे कार्यकर्ते चंद्राकांत खैरे यांच्या गेस्ट हाऊसवर पोहचले. बेळगाव, निपाणी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेअशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. महाराष्ट्रभर सर्वचं खासदारांची झोपमोड करणार असल्याचं छावाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. आम्ही जेव्हा रात्री तुमची झोप मोडतो, तेव्हा आमचीही झोप मोडलेली आहे. या प्रश्नी लवकर पावलं उचलली गेली नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राची झोप मोडेल. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी एकत्र यावं आणि या प्रश्नी लढा द्यावा, असं निवेदन या वेळी खैरे यांना देण्यात आलं."सीमाभागातील मराठी भाषिकांवर प्रचंड अन्याय केला जात आहे. त्यांचा आक्रोश खासदारांपर्यंत पोहचावा, यासाठी आम्ही खासदारांची झोपमोडा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांची झोप मोडून ते जागृत व्हावेत आणि या प्रश्नाविरुद्ध संसदेत आवाज उठावा यासाठी आम्ही हे आंदोलन हाती घेतलं आहे. चंद्रकांत खैरे यांच्यापासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे. नजिकच्या काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांच्या झोपा आम्ही मोडू" असं छावा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी सांगितलं.

close