हिट अँड रन प्रकरणी सलमानवर आरोप निश्चित

July 24, 2013 3:58 PM0 commentsViews: 566

salman khan24 जुलै : 2002 च्या हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खान अडचणीत आलाय. मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटनं आज सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली खटला चालणार असल्याचं जाहीर केलं. या खटल्यात जर सलमान दोषी सिद्ध झाला तर त्याला जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

हिट अँन्ड रन प्रकरणी सलमान खानवर आयपीसी 304 ( 2) या कलमानुसार सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात आला आहे. 2002 साली सलमाननं भरधाव गाडी चालवून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जखमी झाले होते. याप्रकरणी त्याच्यावरती रॅश ड्रायव्हींग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यावेळी 304 (2) नुसार सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला नव्हता.

काही महिन्यांपूर्वी वांद्र्याच्या संबंधित कोर्टाने सलमान खानचा खटला सेशन्स कोर्टात वर्ग केला होता. त्याला सलमान खाननं आव्हान दिलं होतं. मात्र सलमानचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. अखेर आज या निकालावर कोर्टाने निर्णय दिला.

close