श्रीलंकेचा पाकिस्तानवर 234 रन्सनं दणदणीत विजय

January 25, 2009 7:15 AM0 commentsViews: 1

25 जानेवारी, पाकिस्तानश्रीलंका आणि पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या वनडेत श्रीलंकेनं तब्बल 234 रन्सनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच 3 वन डे मॅचची सीरिज श्रीलंकेनं 2-1 अशी जिंकली. पाकिस्तानला घरच्या मैदानात, घरच्या प्रेक्षकांसमोर मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. श्रीलंकेनं पहिली बॅटिंग करताना 309 रन्स केले. ओपनर तिलकरत्ने दिलशाननं तुफान बॅटिंग करत नॉटआऊट 137 रन्स केले. हे बलाढय आव्हान पाकिस्तानला पेलवलं नाही. त्यांची पूर्ण टीम अवघ्या 75 रन्समध्ये ऑलआऊट झाली. त्यांचे तब्बल चार बॅटसमन शून्यावर आऊट झाले. श्रीलंकेतर्फे कुलसेकरा आणि थुशारानं प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर मुथैय्या मुरलीधरननं दोन विकेट घेत वनडे करियरमध्ये 500 विकेटचा टप्पा पार केला.

close