अधिवेशनात आतापर्यंत 8 हजार 42 कोटींची कामं मंजूर

July 24, 2013 2:29 PM1 commentViews: 172

Image img_164602_vidhanbhavan3_240x180.jpg24 जुलै : पावसाळी अधिवेशनात आत्तापर्यंत जे महत्त्वाचं कामकाज झालंय त्यामध्ये 8 हजार 43 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत. त्यातला 2 हजार 303 कोटी रुपयांचा निवडणूक निधी बाजूला काढून सत्ताधारी आमदारांची त्यांच्या मतदारसंघातली कामं मंजूर करण्यात आली आहे. तसंच एसईझेडसाठी संपादित केलेली शेतजमीन बांधकामासाठी खुली करणारं विधेयक, खासगी विद्यापीठांना पूर्ण मुभा देणारं विधेयक आणि कृषी विद्यापीठांचं विधेयक अशी तीन महत्त्वाची विधेयकं सुद्धा मंजूर झाली आहेत. पण सहकार सुधारणा विधेयक आणि पुरवणी मागण्यांचं विनियोजन विधेयक आज सरकारला मंजूर करून घ्यायचं आहे. त्यामुळेच चार विरोधी आणि एका सहयोगी आमदाराचं निलंबन सरकारनं मागे घेतल्याची जोरदार चर्चा आहे. पण ही शक्यता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी खोडून काढलीय.

  • yogesh agaj

    कोणत्या तालुक्यात किती निधि दिले ते पण सांग म्हणजे तित्ल्या अमदारानी या अदिवेशनात किती कमावता येतील त्याचा अभ्यास करता येईल –

close