वर्ध्यात पावसाचा कहर,जनजीवन विस्कळीत

July 24, 2013 7:11 PM0 commentsViews: 253

45724 जुलै : वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं पुन्हा जनजीवन विस्कळीत झालंय. वर्धा, वना, यशोदा, धांम या मोठ्या नद्यांसह नाले ओसंडून वाहत आहे. नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे सेलू तालुक्यातील अनेक घरात पाणी शिरलंय. शेतात साचून असणार्‍या पाण्यामुळ पिकं सडायला लागलीत. शाळा-महाविद्यालयात उपस्थिती बोटावर मोजण्या इतकी झाली आहे. जिल्ह्यातल लोअर वर्धा प्रकल्पाचे 15, बोर प्रकल्पाचे 4, बेबळा प्रकल्पाचे 5, अप्पर वर्धा प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. येत्या 48 तासात पुन्हा मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

close