बर्डिचने रॉजर फेडररला झुंजवलं

January 25, 2009 10:58 AM0 commentsViews: 5

25 जानेवारीऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रॉजर फेडरर आणि थॉमस बर्डिच यांच्यातली मॅच पाच सेटपर्यंत रंगली. पहिले दोन सेट 6-4 आणि 7-6 असे जिंकून बर्डिचने फेडररवर दडपण आणलं होतं. पण यापूर्वी तिनदा ही स्पर्धा जिंकलेल्या फेडररने तिस-या सेटमध्ये आपला खेळ उंचावला. हा सेट 6-4 असा जिंकून मॅचमध्ये आव्हान कायम राखलं. त्यानंतर मात्र फेडररला फॉर्म गवसला आणि बर्डिचलाही हॅमस्ट्रिंगची दुखापत सतावत गेली. चौथ्या आणि पाचव्या सेटमध्ये फेडररने आपला सगळा अनुभव पणाला लावून खेळ केला आणि हे सेट जिंकत मॅचही खिशात टाकली. ही मॅच 3 तास 29 मिनिटं चालली. आता क्वार्टर फायनलमध्ये फेडररची गाठ आठव्या सिडेड युवान मार्टिन डेल पेट्रोशी पडणार आहे.

close