झिम्बाब्वे दौर्‍यात भारताची विजयी सलामी

July 24, 2013 9:13 PM0 commentsViews: 681

virat win24 जुलै : कॅप्टन विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर झिम्बाब्वे दौर्‍यात भारतानं विजयी सलामी दिलीय. हरारे इथं रंगलेल्या पहिल्या मॅचमध्ये भारताने झिम्बाब्वेचा 6 विकेट राखून पराभव केला. झिम्बाब्वेने भारतासमोर विजयासाठी 229 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारतानं 4 विकेटच्या मोबदल्यात 45 व्या ओव्हरमध्ये पार केलं.

विराट कोहलीने 108 बॉलमध्ये 115 रन्सची कॅप्टन इनिंग केली. यात त्यानं 13 फोर आणि 1 सिक्स मारला. वन डे करिअरमधली ही त्याची 15वी सेंच्युरी ठरलीय. तर अंबाती रायडूनं हाफसेंच्युरी करत त्याला चांगली साथ दिली. याआधी झिम्बाब्वेनं पहिली बॅटिंग करत 228 रन्स केले. भारताकडून अमित मिश्रानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या आहे.

close