जागा वाटपावरून भाजप शिवसेनेत हमरीतुमरी

January 25, 2009 9:35 AM0 commentsViews:

24 जानेवारी बीडसद्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरे करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी शेतक-यांच्या मुद्यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. पण बीड इथे त्यांनी आपला मित्र पक्ष शिवसेनेला चक्क इशारा दिला. लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजप शिवसेनेला एकही जागा वाढवून देणार नाही, अशी घोषणा गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी केली. संघर्ष यात्रेदरम्यान मुंडे बीडमध्ये बोलते होते.

close