पावसाने भिजवलं, पश्चिम रेल्वेनं रडवलं

July 24, 2013 9:25 PM0 commentsViews: 725

mumbai local24 जुलै : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले त्यातच आज संध्याकाळी वांद्रे इथं सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मुंबईकरांच्या कटकटीत आणखी भर टाकली. आज संध्याकाळपासून पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे लोकल 40 ते 45 मिनिट उशिरानं धावत आहे. विशेषत: चर्चगेटकडून विरारकडे जाणार्‍या वाहतुकीवर याचा परिणाम झाला. त्यामुळे संध्याकाळी घरी परतणार्‍या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. फ्लॅटफॉर्मवर लोकांची प्रचंड गर्दी उसळलीय. गर्दीतून वाट काढत चाकरमाण्यांनी बेस्ट बस, टॅक्सीचा मार्ग निवडला. पण अगोदरच पावसामुळे मंदावलेल्या वाहतुकीचा यामुळे पुरता बोजवारा उडाला. तास तास लटकत चाकरमान्यांना घरं गाठावे लागले.

close